मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|

राम गणेश गडकरी - कुणि ऐका हो ऐका एकच वेळ ।...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


कुणि ऐका हो ऐका एकच वेळ । हा दुदैंवाचा खेळ ॥
मी शास्त्रांचा मोठा पंडित नाहीं । नच शिकलों पढलों कांहीं ॥
मृत हृदयाचें रडकें केविलवाणें । गरिवीचें माझें गाणें ॥
दैवाचे पाहुनि झगडे ॥
मम ह्रदय जाहलें उघडें ॥
मग गाई वेडें बगडें ॥
घ्या मानुनि हें;  चुकलें मुकलें कांहीं । तरि उपाय माझा नाहीं ॥१॥
दुदैंवाची करणी अघटित कांहीं । दुष्काळ पसरला बाई ॥
निज बाळाला पाजीना ती आई । गोठयांत उडाल्या गाई ॥
चहुं मुलखीं हो एकच उपासमारा । चिमणीला नाहीं चारा ॥
झाडावर नाहीं पान ॥
वैराणच रानोंरान ॥
दुनियेचा बदले वान ।
लवलेश कुठें अन्नाचा न मिळावा ॥ पोटांत पेटला वणवा ॥२॥
किति आड तळीं विहिरी गेल्या खोल । नांवाला नाहीं ओल ॥
जणुं प्रेतांच्या डोळ्यांच्या त्या खांचा । भेसूर भाव दोघांचा ॥
नदिनाल्यांना तापुनि रेतीचूर । मृगजळेंच आले पूर ॥
पाण्याविण होतां भडका ॥
दगडाला देती धडका ॥
परि पाझर कुठला खडका ॥
यमरायाचे दूत फिरति चौफेर । सर्वांचा उठला शेर ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP