मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|

पांडवप्रताप - अध्याय १३ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
अनंतर सुमुहूर्तें करून ॥ निघते जाहले पंडुनंदन ॥ संगें घेऊनि अपार सैन्य ॥ याज्ञ सेन निघाला ॥१॥
द्रुपदें देऊनि सेना संपत्ती ॥ गौरविलें पांडवांप्रती ॥ रथ अश्व भद्रजाती ॥ आंदण देत बहुत पैं ॥२॥
दासी दास अपार ॥ शय्यास्थानें पृथगाकार ॥ शिबिकादि वाहनें सुंदर ॥ रत्न जडित दीधलीं ॥३॥
सुवर्ण भाजनें विशेष ॥ शिबिरें तगट जडित कळस ॥ सहस्त्र अर्बुदें भरूनि कोश ॥ द्र्व्य सांगातें दीधले ॥४॥
कुंती आणि याज्ञ सेनी ॥ बैसती पृथक शिबिकायानीं ॥ कनकांबरी झांकूनी ॥ मुक्तजाळ्या तयांवरी ॥५॥
ज्यांच्या वाहनां पुढें निश्चिती ॥ कन कंदड घेऊनि हातीं ॥ सहस्त्रावधि दूत धांवती ॥ वाव करिती चाला वया ॥६॥
यादवेश्वर आणि पार्थ ॥ एके रथीं जाती बोलत ॥ इंद्र आणि अंगिरा सुर ॥ कीं शशी आदित्य एकत्र पैं ॥७॥
भिन्न भिन्न रथांवरी ॥ चौघे बंधु बैसले झडकरी ॥ नाना वाद्यें प्रचंड भेरी ॥ एक सरें ठोकिल्या ॥८॥
निज भारेंशीं धृष्टद्युम्र ॥ पाठीं चाले प्रीती करूनी ॥ छप्पन्नकोटी यादव रेवतीरमण ॥ निजभारेंशीं चालती ॥९॥
सांगतां विसरलों साचार ॥ ज्या रथीं अर्जुन जगदीश्वर ॥ तेथेंचि बैसला विदुर ॥ महा भक्त त्रिकाल ज्ञानी ॥१०॥
पांडवांसी बोळवून ॥ माघारा गेला पृषदनंदन ॥ इकडे गजपुरासी गजरें करून ॥ पांडव आले आनंदें ॥११॥
त्वरें येऊनि विदुर ॥ धृतराष्ट्रा जाणवी समाचार ॥ आल्हाद वाटला थोर ॥ पुढें दलभार पाठविला ॥१२॥
कर्ण शारद्वत द्रोण ॥ सन्मुख पातले राज नंदन ॥ नागरिक आनंदले संपूर्ण ॥ गुढिया मखरें उभविती ॥१३॥
नगरनरनारी संपूर्ण ॥ पहावया वेगें करून ॥ मंडपघसणी जाहली जाण ॥ पांडववदनें पहावया ॥१४॥
रत्नदीप घेऊनि करीं ॥ ओंवाळिती नगरनारी ॥ पांडव वांचले जोहरीं ॥ पूर्ण भाग्यें देखिले ॥१५॥
गजरें राज सदना पातले ॥ चरण पितयाचे वंदिले ॥ अंधनयनीं अश्रु आले ॥ आलिंगिलें पांचां जणां ॥१६॥
म्हणे धन्य आजि सुकृत ॥ द्दष्टीं देखिले माझे सुत ॥ भीष्मद्रोणांसी पांडव नमीत ॥ आशीर्वाद देती प्रीतीनें ॥१७॥
सदा विजय आनंद कल्याण ॥ स्वपदीं नांदावें सुख संपन्न ॥ क्षणक्षणां प्रीती करून ॥ द्रोण आलिंगी पार्थातें ॥१८॥
कर्ण जयद्रथ शल्य शकुनी ॥ दुर्योधन दुःशा सनादिकरूनी ॥ निर्मत्सर सभास्थानीं ॥ पांडवां भेटले आदरें ॥१९॥
प्रतीपतनय बाल्हीक ॥ त्यासी नमिती सकळिक ॥ गांधारीजननीसी देख ॥ नमिती पांडव अनुक्रमें ॥२०॥
कुंती आणि सौबली ॥ स्त्रेहें भेटती त्या कालीं ॥ आदरें येऊनि पांचाली ॥ सर्व वडिलां वंदीतसे ॥२१॥
काशी श्वराची नंदिनी ॥ दुर्योधनाची पट्टराणी ॥ येऊनि कुंतीपांचालींचे चरणीं ॥ वंदन करीत तेधवां ॥२२॥
गांधारीच्या शत सुना ॥ पूजिती तेव्हां पांडवांगना ॥ देऊ नियां वस्त्रा भरणां ॥ नानापरी तोष विती ॥२३॥
आपुला लिया मंदिरां प्रती ॥ पांडव कृष्णा कृष्ण कुंती ॥ हर्षें स्वस्थानीं प्रवेशती ॥ दुःखें विसरती अवघींही ॥२४॥
नित्य श्रीरंगाचें दर्शन ॥ विदुराशीं सदा संघट्टन ॥ तो संसार नव्हे संपूर्ण ॥ केवळ अद्वय समाधि ॥२५॥
महत्पुण्याचे पर्वत ॥ अनंत जन्मींचें तप अद्भुत ॥ तें फळा आलें तरी वैकुंठनाथ ॥ मंदिरांत सदा वसतसे ॥२६॥
जाहले कित्येक दिवस ॥ धृतराष्ट्र पाचारी धर्मास ॥ कर्णीं सांगे रहस्य ॥ अन्याय निजपुत्रांचा ॥२७॥
हे दुर्योधनादि दुर्मती ॥ माझें वचन न ऐकती ॥ मज चक्षुहीन देखती ॥ हेळसिती बहुसाल ॥२८॥
विकल्पें कलह करिती ॥ महापाणी शकुनी दुर्मती ॥ तरी तुम्ही घेऊनि अर्ध जगती ॥ इंद्र प्रस्थीं राहा सुखें ॥२९॥
त्यांसी न सांगावे हे विचार ॥ तुज वरीच धरीन मी छत्र ॥ मग बोलावूनि विदुर ॥ सर्व सामग्री सिद्ध केली ॥३०॥
अष्टोत्तर शत घट देख ॥ आणवी जान्हवीचें उदक ॥ दिव्य सुवर्णाचे सम्यक ॥ अलंकार घडविले ॥३१॥
किरीट कुंडलें पदकमाला ॥ मुद्राकंकणें कटिमेखला ॥ दिव्यवस्त्रें ते वेळां ॥ अमोलिक आण विलीं ॥३२॥
श्वेत सूर्य पर्णें श्वेतातपत्रें ॥ नीलवर्ण मेघडंबरें ॥ मकर बिरुदें पवित्रें ॥ श्वेत चामरें आणवीत ॥३३॥
श्वेत हस्ती चौदंत ॥ श्वेत हयराज वेग बहुत ॥ चतुःसमुद्रींचें नीर आणवीत ॥ पंच पल्लव सप्त मृत्तिका ॥३४॥
धृत राष्ट्रासी म्हणे श्री कृष्णनाथ ॥ धन्य बुद्धि तुझी पुण्यवंत ॥ तरी येचि समयीं असे मुहूर्त ॥ जयवार जय तिथी ॥३५॥
ऐकोनियां कृष्णवचन ॥ पाचारिले ऋषि संपूर्ण ॥ महाराज सत्यवती नंदन ॥ करितां स्मरण पातला ॥३६॥
सुवर्णपीठीं युधिष्ठिर ॥ धौम्यें बैस विला सत्वर ॥ अभिषे किती ॥ पंडु कुमार ॥ जय जय कार ऊठला ॥३७॥
दिव्यवस्त्रें दिव्यालंकार ॥ लेइला तेव्हां युधिष्ठिर ॥ दिव्य सिंहा सन आप पत्र ॥ वडिलें दिधलें धर्मासी ॥३८॥
धृत राष्ट्रें विदुरा सांगीतलें ॥ त्याहूनि चतुर्गुण द्र्व्य वेंचिलें ॥ दानें ऋषि तृप्त केले ॥ धेनुवस्त्रालंकारांशीं ॥३९॥
महाराज पंडुनृपवर ॥ तेणें वसुधा जिंकिली समग्र ॥ मोजूं न शके सहस्त्रवक्र ॥ इतुकें द्र्व्य तयाचें ॥४०॥
सांगोपांग यथोचित ॥ विदुर उदार संपादीत ॥ मग गजारूढ मिरवत ॥ धर्मराज गजपुरीं ॥४१॥
सुवर्ण सुमनांचे संभार ॥ लोक वर्षिती अपार ॥ इंद्रप्रस्थाचा राजेंद्र ॥ धर्मराज मिरवत ॥४२॥
धर्मासी सांगे सत्यवती नंदन ॥ पृथ्वीचे राजे जिंकून ॥ मित्र भावें वश करून ॥ आपणा आधीन वर्तवीं ॥४३॥
पुढें करीं राज सूय यज्ञ ॥ तेणें संतोषती पितृगण ॥ एक कौरव वेगळे करून ॥ विश्वसुखद तूं राजा ॥४४॥
भीमार्जुनांसी बोलावूनी ॥ धृतराष्ट्र सांगे तयांचे कर्णीं ॥ सेने सह धर्मासी घेऊनी ॥ आतांचि जावें इंद्र प्रस्था ॥४५॥
माझिया पुत्रांसी दुःख अपार ॥ ह्रदयीं धडकें वैश्वानर ॥ तरी तुम्ही येथोनि सत्वर ॥ इंद्र प्रस्थ आटोपा ॥४६॥
आज्ञा समर्थ म्हणोनी ॥ पांचही मस्तकें ठेविती चरणीं ॥ भीष्मद्रोणांसी नमूनी ॥ करिती नगर प्रदक्षिणा ॥४७॥
स्यंदनारूढ तेचि क्षणा ॥ चालिल्य कुंती आणि कृष्णा ॥ त्रिभुवननायक यादवराणा ॥ सवें घेऊनि चालिले ॥४८॥
सर्व भावें नमिला विदुर ॥ नगर लोक राहिले समग्र ॥ इंद्र प्रस्थ महानगर ॥ प्रवेशले ते काळीं ॥४९॥
तों इंद्रप्रस्थींचे प्रजाजन ॥ सामोरे येती त्वरें धावोन ॥ नाना उपायनवस्तु आणून ॥ धर्मराया भेटती ॥५०॥
श्रृंगारिली समस्त नगरी ॥ गुढिया मखरें उभविलीं द्वारीं ॥ प्रचंड गर्जती राज भेरी ॥ गुढिया अंबरीं झळकती ॥५१॥
करीं रत्नदीप घेती ॥ नगरनारी ओंवाळिती ॥ मूद निंबलोण उतरिती ॥ मुखवरूनि पांडवांच्या ॥५२॥
धर्में देखोनि तो सोहळा ॥ नगरनारी लोकां सकळां ॥ वस्त्रें भूषणें ते वेळां ॥ देऊ नियां तोष विलें ॥५३॥
कृष्णे स्मरतांचि देव पाल ॥ वरूनि उतरला तत्काल ॥ म्हणे आज्ञा करावी समूल ॥ सिद्धीसी पाववीन सर्वही ॥५४॥
इंदिरावर इंद्रासी म्हणत ॥ तव नामें हें नगर मिरवत ॥ रचना येथें करावी अद्भुत ॥ अमरावती सारिखी ॥५५॥
शक्रें विश्वकर्म्यासी बोला वूनी ॥ निर्मिली तेथें राजधानी ॥ शोधितां समस्त अवनी ॥ ऐसी रचना नसेचि ॥५६॥
न लागे पातियासी पातें ॥ तों इंद्रप्रस्थ रचिलें तेथें ॥ पाहतां त्या कौशल्यरचनेतें ॥ तटस्थ समस्त जाहले ॥५७॥
मनुष्य करणी परती सारून ॥ रचिलें केवळ इंद्र भुवन ॥ हस्तिनापुर नीच पूर्ण ॥ शक्र प्रस्थ श्रेष्ठ करी ॥५८॥
सप्त दुर्गें गगनचुंबित ॥ हुडे जैसे कनकाद्रीचे सुत ॥ शतखणी गोपुरें विराजित ॥ जडितलेपें झळकती ॥५९॥
सकल संपत्ति भरून ॥ स्वस्थाना गेला सह्स्त्र नयन ॥ तेथें राज्य करिती पंडुनंदन ॥ साह्य श्री कृष्ण सर्वदा ॥६०॥
मुख राज गृह परम सुंदर ॥ गृह तैशी संपत्ति समग्र ॥ संपत्ति तेथें अहोरात्र ॥ धर्म वसे निश्चयें ॥६१॥
धर्म तेथें सदा दान ॥ दान तेथें जनार्दन ॥ जनार्दन तेथें कमला येऊन ॥ चिरकाल स्थिर असे ॥६२॥
कमला तेथें सुख विशेष ॥ सुख तेथें सहज उल्हास ॥ उल्हास तेथें महा पुरुष ॥ संतजन मिळती पैं ॥६३॥
संत तेथें वसे शांती ॥ शांति तेथें वसे निवृत्ती ॥ तेथें निश्चितीं ॥ समाधान सर्वदा ॥६४॥
समाधान तेथें समाधी ॥ समाधि तेथें कैंची आधी ॥ आधि नाहीं तेथें उपाधी ॥ नसे मग तत्त्वतां ॥६५॥
आधि तुटतां अभेद ॥ अभेद तेथें ब्रह्मा नंद ॥ तो ब्रह्मा नंद केवळ गोविंद ॥ पांडवांघरीं वसतसे ॥६६॥
असो नित्य नैमित्तिक कर्में ॥ धर्म आचरी सदा नेमें ॥ सकल राष्ट्र सुखागमें ॥ क्लेशरहित नांदत ॥६७॥
कुटुंबां साहित ऋषीश्वर ॥ सिद्ध साधक योगीश्वर ॥ देऊनियां संपत्ति मंदिर ॥ युधिष्ठिर नांदवी ॥६८॥
अखंड संत समागम पूर्ण ॥ सदा सच्छास्त्र श्रवण ॥ नानाशाखांचें अध्ययन ॥ पुराण श्रवण घरोघरीं ॥६९॥
टाळ मृदंग संगीत ॥ हरिकीर्तनें भक्त गर्जत ॥ देवार्चनें शोभिवंत ॥ सदा हरिहरांची उपासना ॥७०॥
याचकांची इच्छा पाहून ॥ तैसेंचि देती लोक दान ॥ दरिद्र दुःख वृद्धपण ॥ नगरीं कोणा नसेचि ॥७१॥
यथा कालीं वर्षे घन ॥ गायींसी त्रिकाल दुग्ध पूर्ण ॥ पुष्पवृक्षांसी एक बंधन ॥ दंड छत्रासचि जाणिजे ॥७२॥
असो पुसोनि पंडुनंदनां ॥ वासुदेव चालिला वसुदेव दर्शना ॥ धर्म म्हणे जगन्मोहना ॥ जाऊनि यावें सत्वरी ॥७३॥
राजीवनेत्रा सुहास्यवदना ॥ कोटिकंदर्पविराज माना ॥ लावण्या सागरा परिपूर्णा ॥ ब्रह्मा नंदा सुखाब्धे ॥७४॥
तुझें श्री मुख साजिरें ॥ पाहतां माझी धणी न पुरे ॥ माउली श्रीरंगे अत्युदारे ॥ न विसरें तुझे उपकार ॥७५॥
तुझें न पाहतां वदन ॥ वाटतें उन्मूलती नयन ॥ तुझ्या नाम स्मरणा विण ॥ जिव्हा झडोन जाईल ॥७६॥
माझ्यानें जा न म्हणवे जाण ॥ लवकरी यावें परतोन ॥ आम्हां दीनांचें पालन ॥ कोण करील तुज विण ॥७७॥
जनक जननी बंधु भगिनी ॥ तूंचि आमुची कुल स्वामिनी ॥ मूलपीठद्वारकावा सिनी ॥ संकट पाहोनि धांवसी ॥७८॥
पांच पांडव द्रौपदी सती ॥ भोंवतीं कृष्ण वदन विलोकिती ॥ नयनीं अश्रुधारा स्त्रवती ॥ मिठी घालिती पायांसी ॥७९॥
नय नोदकें करून ॥ प्रक्षा लिती श्री कृष्ण चरण ॥ श्री कृष्णें सद्नद होऊन ॥ ह्रदयीं धरिलीं साही जणें ॥८०॥
म्हणे तुम्हांसी न विसंबें एक क्षण ॥ संकटीं येईन धांवोन ॥ पांडव माझे पंच प्राण ॥ जीवन कला द्रौपदी ॥८१॥
तुम्हां कारणें साचार ॥ म्यां धरिलासे हा अवतार ॥ उतरीन आतां भूभार ॥ निमित्त तुमचें करूनियां ॥८२॥
ऐसें करूनि समाधान ॥ द्वारकेसी निघे जगज्जीवन ॥ छप्पन्नकोटि दल संपूर्ण ॥ रेवतीरमणा समवेत ॥८३॥
बलराम आणि श्रीपती ॥ नमस्कारिती कुंती प्रती ॥ वाघें गजरें दुमदुमती ॥ द्वारकापुरी प्रति गेले ॥८४॥
जातां सांगितलें धर्मातें ॥ नारद आतां येईल येथें ॥ तो सांगेल जे बुद्धीतें ॥ ते चित्तीं धरीं सर्वज्ञा ॥८५॥
वेगें गेले द्वारकेसी ॥ तों सवेंचि आला नारद ऋषि ॥ नमस्करूनियां तयासी ॥ वरासनीं पूजिला ॥८६॥
मग पांडवांसी बैसवून ॥ नारद म्हणे ऐका वचन ॥ एक नारी भ्रतार पांच जण ॥ विरोधा लागीं निमित्त पैं ॥८७॥
हिरण्याक्षाचा सुत ॥ निशुंभनामें विख्यात ॥ सुंदोपसुंद निश्चित ॥ त्याचे पुत्र प्रतापी ॥८८॥
दोघांचा स्त्रेह परिपूर्ण ॥ एक शय्या एक भोजन ॥ त्यांहीं उग्र तप करून ॥ देवां पळवूं इच्छिलें ॥८९॥
शिव आणि चतुरानन ॥ प्रसन्न जाहले त्यांलागून ॥ आमुचें सामर्थ्य सर्वांहून ॥ चाले ऐसें करावें ॥९०॥
आम्हांसी न व्हावें मरण ॥ मग बोले हंसवाहन ॥ तुम्हां बंधूंत विरोध पूर्ण ॥ होय मरण ते काळीं ॥९१॥
ते म्हणती आम्हांत विरोध ॥ होईल हे गोष्टी अबद्ध ॥ मग त्यांहीं करूनि युद्ध ॥ त्रिभुवन हें त्रासिलें ॥९२॥
गाई ब्राह्मणांसी वधिती ॥ देव स्थानें विध्वां सिती ॥ ओस पाडिली अमरावती ॥ बंदीं नृपती घातले ॥९३॥
ऋषी देव प्रजा मिळोन ॥ ब्रह्म देवासी गेले शरण ॥ तेणें यत्नें अवयव घालून ॥ नारी एक रचियेली ॥९४॥
तिल प्रमाण जोडूनि रत्नें ॥ स्वहस्तें निर्मिली विधीनें ॥ तिलोत्तमा नाम तिज कारणें ॥ विंध्याचला पाठविली ॥९५॥
सूंदोप सुंद बैसले सभेसी ॥ तों विद्युल्लता झळके जैशी ॥ देखतां लावण्यराशी ॥ दोघे बंधु धांवले ॥९६॥
दोघीं धरिले दोन्ही हस्त ॥ वडील सुंद तेव्हां बोलत ॥ हे माझी स्त्री यथार्थ ॥ माते समान तूं मानीं ॥९७॥
उपसुंद म्हणे कामिनी ॥ तूं भगिनी स्त्रुषे समान मानीं ॥ परी एक एकाचें न मानी ॥ गदा घेऊनि उठियेले ॥९८॥
युद्ध जाहलें बहुत ॥ सुंद मस्तकीं गदा घालीत ॥ कर्ण मूलीं ताडीत ॥ उपसुंद गदाघायें ॥९९॥
दोघे पडले अचेतन ॥ तत्काल गेले निघोनि प्राण ॥ तिलोत्तमा जाऊनि तेथून ॥ सूर्य लोकीं राहिली ॥१००॥
पुढें तिसी सुरेश्वर भोगीत ॥ ऐसा हा स्त्रीलोभें अनर्थ ॥ तरी द्रौपदीचे दिवस नेमस्त ॥ वर्ष वांटितों समस्त हें ॥१०१॥
दोन मास द्वादश दिवस ॥ पांचां ठायीं नेमस्त वरुष ॥ एकाची स्त्री असतां चौघांस ॥ संबंध नाहीं तत्त्वतां ॥१०२॥
एकांतीं निकट असतां ॥ जो कोणी विलोकी अवचितां ॥ त्याचे गुरुतल्प ब्रह्म हत्या ॥ दोष येईल मस्तकीं ॥१०३॥
त्यासी प्रायश्चित्त पूर्ण ॥ द्वादश वर्षें तीर्थाटन ॥ भंगितां माझें नेमवचन ॥ शाप देईन तत्काल ॥१०४॥
ऐशा नेमपाशें करून ॥ नारदें बांधिले पंडुनंदन ॥ पांचांनीं करूनि नमन ॥ वचन मान्य केलें तें ॥१०५॥
मग समर्पून पूजासं भार ॥ संतोष विला ब्रह्म कुमार ॥ सवेंचि गुप्त जाहला मुनीश्वर ॥ द्वारकापुरा पावला ॥१०६॥
किती एक दिवस जाहलियावरी ॥ राष्ट्रांत एका ब्राह्मणाचे घरीं ॥ घाला घालूनि तस्करीं ॥ सवत्स धेनु नेलिया ॥१०७॥
तेव्हां ह्र्दय पिटीत ब्राह्मण ॥ पार्थापाशीं आला धांवोन ॥ म्हणे महावीरा गोधन ॥ तस्कर माझें नेताती ॥१०८॥
ऐकतां उठिला पार्थवीर ॥ तों चित्र शाळेंत चापशर ॥ होतीं जेथें द्रौपदी युधिष्ठिर ॥ एके ठायीं पहुडलीं ॥१०९॥
आठवलें नारदाचें वचन ॥ इकडे बाह्रण करी रोदन ॥ मग पार्थ पाहे विचारून ॥ विशेष पुण्य गोरक्षणीं ॥११०॥
करीन द्वादश वर्षे तीर्थवास ॥ परी हरो ब्राह्मणाचा क्लेश ॥ मग चित्रशाळेंत करूनि प्रवेश ॥ शस्त्रें घेऊन धांवला ॥१११॥
आटोपूनि तस्कर सकल ॥ शिरश्छेद केले तत्काल ॥ गोधन देऊनि पुण्याशील ॥ ब्राह्मण परम तोष विला ॥११२॥
नारद वचन स्मरोन ॥ मग वंदिले धर्माचे चरण ॥ म्हणे आज्ञा दीजे मज लागून ॥ तीर्थटना जावया ॥११३॥
धर्म म्हणे ते वेळां ॥ तुझा नेम नाहीं टळला ॥ तुवां गोवृंद सोडविला ॥ संतोष विलें ब्राह्मणा ॥११४॥
पार्थ म्हणे ते समयीं ॥ नेम न टळे कालत्रयीं ॥ द्वादश वर्षीं लवलाहीं ॥ येतों तुझिया दर्शना ॥११५॥
संकट जाणोनि परम ॥ आज्ञा देत तेव्हां धर्म ॥ सवें निघाले द्विजोत्तम ॥ पार्थ संगें तीर्थाटना ॥११६॥
पावन तीर्थें करीत ॥ स्थळीं स्थळीं स्थळीं उत्तम ॥ दानें देत ॥ तीर्थ माहिमा पाहात ॥ गंगा द्वारा पातला ॥११७॥
स्त्रान संध्या ब्रह्म यज्ञ जाण ॥ हरिचरणोद्भवेंत संपादून ॥ बाहेरी येत जंव अर्जुन ॥ तों अपूर्व वर्तलें ॥११८॥
कौर्व नागर राज कुमारी ॥ उलूपी वसे गंगा तीरीं ॥ जे परम सुंदर लावण्य लहरी ॥ शचीरतीस मान ॥११९॥
तिनें धरूनि अर्जुन ॥ ओढूनि नेला सदना लागून ॥ म्हणे तुझें स्वरूप देखोन ॥ मन माझें वेधलें ॥१२०॥
अंगसंगें करून ॥ तृप्त करीं माझें मन ॥ मग म्हणे अर्जुन ॥ मी व्रतस्थ तापसी ॥१२१॥
मग पद्मीण बोले वचन ॥ मी त्यजीन आपुला प्राण ॥ मज रक्षितां तुज थोर पुण्य ॥ वंश वृद्धीतें पाववीन मी ॥१२२॥
मी तुझी स्त्री विशेष ॥ व्रत भंगितां नाहीं दोष ॥ तिनें पार्थाचे गळां निर्दोष ॥ माळ घातली प्रीतीनें ॥१२३॥
मग तेथें राहूनि एक रात्री ॥ सुरतानंदें दिधली तृप्ती ॥ संतोष जाहला तिज प्रती ॥ तों गभस्ति उगवला ॥१२४॥
मग तेथोनि निघाला पार्थ ॥ पावला हिमालय पर्वत ॥ केदार बदरी महातीर्थ ॥ धर्मशील पाहातसे ॥१२५॥
हिरण्य़ बिंदुतीर्थ करून ॥ प्राची दिशेसी पावला अर्जुन ॥ प्रवेशला नैमिषारण्य ॥ तपोधनांसी वंदीतसे ॥१२६॥
भागीरथीसी सव्य घालीत ॥ अंगवंगादि देश पाहात ॥ दक्षिण दिशेशी पार्थ ॥ महेंद्रपवतीं पावला ॥१२७॥
सिद्ध साधक सेविला पर्वला ॥ पुढें रत्नाकर महोदधि दिसत ॥ तेथें पंचरात्री पार्थ ॥ आनंदें क्र्मीत सत्संगें ॥१२८॥
तये समुद्राचे तीरीं ॥ मणिपुरानाम नगरी ॥ तेथें राजा राज्य करी ॥ चित्र वाहन नाम तया ॥१२९॥
त्याची कन्या चित्रांगी जाण ॥ लावण्य खाणी परम सुगुण ॥ तिनें लक्षिला अर्जुन ॥ स्त्रान करितां सिंधुजीवनीं ॥१३०॥
पितयासी सांगे जाऊनी ॥ एक पुरुष म्यां देखिला नयनीं ॥ परम तेजस्वी जैसा तरणी ॥ वर करूनि देईं तो ॥१३१॥
कन्येचें करूनि समाधान ॥ पार्था जवळी आला चित्र वाहन ॥ नाम गोत्र कुल ऐकून ॥ परमा नंद जाहला ॥१३२॥
म्हणे पार्था पंडुनंदना ॥ चित्रांगी हे माझी हे माझी कन्या ॥ तूं अंगिकारीं शुभांगना ॥ करीं वासना पूर्ण माझी ॥१३३॥
इचे पोटीं होईल कुमार ॥ त्यासी देईन राज्य भार ॥ यावरी पंडुकुमार ॥ अंगिकारी तियेतें ॥१३४॥
करूनि यथा विधि पाणि ग्रहण ॥ तीन वर्षें राहिला अर्जुन ॥ चित्रांगी गरोदर होऊन ॥ बभ्रु वाहन पुत्र झाला ॥१३५॥
संतोषला चित्र वाहन ॥ अपार देत याचकां दान ॥ महाबल वंत वभ्रु वाहन ॥ प्रति अर्जुन दुसरा कीं ॥१३६॥
अश्वमेध पर्वीं पुरुषार्थ ॥ याचा वर्णिजेल अद्भुत ॥ त्यासी राज्य तेथींचें समस्त ॥ चित्र वाहनें दीधलें ॥१३७॥
तेथोनि आज्ञा घेऊनि पार्थ ॥ पुढें चालिला तीर्थें करीत ॥ शिव विष्णु क्षेत्रें पाहात ॥ करी विधियुक्त स्त्रानदानें ॥१३८॥
काम्य कवनीं प्रवेशे पार्थ ॥ तों शिवाचें अनुष्ठानस्थल तेथ ॥ शिव नसतां कुंती सुत ॥ जाऊनि बैसत ते ठायीं ॥१३९॥
अर्जुन बैसला ध्यानस्थ ॥ तों उमावर पातला तेथ ॥ तयासी देखोनि म्हणत ॥ तूं कोण येथें बैसलासी ॥१४०॥
मग बोले अर्जुन ॥ तुज पुसा वया काय कारण ॥ शिव म्हणे माझें स्थान ॥ तूं कोण येथें बैसा वया ॥१४१॥
अर्जुन बोले ते वेळां ॥ ठाव काय तुवां अंकिला ॥ ऐकतां विषकंठ क्षोभला ॥ म्हणे तुज मारीन मी ॥१४२॥
अर्जुनें कार्मुक चढविलें ॥ निर्वाण वरी योजिलें ॥ शिवें पिनाक सांभाळिलें ॥ युद्ध मांडिलें निर्वाण ॥१४३॥
शिवें अग्न्यस्त्र टाकिलें ॥ पार्थें पर्जन्यास्त्र सोडिलें ॥ शिवें शक्त्यस्त्र प्रेरिलें ॥ पार्थें घातलें कार्तवीर्यास्त्र ॥१४४॥
असो असें होतीं जीं बहुतें ॥ तितुकीं टाकिलीं हिमनग जामातें ॥ अवघीं निवारिलीं पार्थं ॥ निजसा मर्थ्यें करू नियां ॥१४५॥
मग संतोषला अपर्णा वर ॥ म्हणे धन्य धन्य तूं महावीर ॥ प्रसन्न जाहलें माग वर ॥ नाम खूण सांगें तुझी ॥१४६॥
येरू म्हणे मी पंडूनंदन ॥ श्री कृष्ण दास नाम अर्जुन ॥ मग शिवें कवच किरीट काढून ॥ प्रसाद दिधला अर्जुनासी ॥१४७॥
मग शिवासी करूनि नमस्कार ॥ पुढें तीर्थें करीत चालिला पंडुकुमार ॥ भ्रमत आला जेथें रामेश्वर ॥ दक्षिण समुद्र तिकडे पैं ॥१४८॥
करू नियां स्त्रान दान ॥ घेतलें रामेश्वराचें दर्शन ॥ तों तेथें अंजनी नंदन ॥ महावीर देखिला ॥१४९॥
पुढें सेतु पाहिला अद्भुत ॥ शतयो जनें लंके पर्यंत ॥ हनुमं तासी पुसे पार्थ ॥ सेतु कोणीं बांधिला हा ॥१५०॥
मारुति सांगे पूर्व वर्त मान ॥ या मार्गें गेला रघुनंदन ॥ तो प्रतापी रविकुळ भूषण ॥ तेणें सेतु बांधिला ॥१५१॥
हांसोनि बोले वीर पार्थ ॥ अहो रामाचें येवढें सामर्थ्य ॥ निज बाणीं कां न बांधिला सेत ॥ शिला किंनिमित्त घातल्या ॥१५२॥
हनुमंत म्हणे वाणांचा सेत ॥ भंगेल जाणोनि रघुनाथ ॥ पाषाणीं सेतुबंधन येथ ॥ करिता जाहला तेधवां ॥१५३॥
पार्थ म्हणे मज ऐसा असता ॥ तरी शरांचा सेतु बांधिता ॥ तों क्रोध आला हनु मंता ॥ म्हणे बांधीं तत्वतां ये वेळे ॥१५४॥
जरी मी एकला वरी चढेन ॥ तरी शरांचा सेतु मोडीत ॥ एक एक वानर पर्वत प्रमाण ॥ कैसा सेतु तगेल ॥१५५॥
पार्थें प्रचीत पहा वया पूर्ण ॥ सेतु बांधिला एक योजन ॥ म्हणे उडी घालीं तूं बळें करून ॥ कैसा मोडेल तें पाहूं ॥१५६॥
अर्जुन म्हणे हेचि शपथ ॥ जरी मोडोनि पडिला सेत ॥ तरी अग्निकाष्ठें भक्षीन सत्य ॥ तूंही निश्चित बोलें पां ॥१५७॥
हनुमंत म्हणे मज नाहीं मरण ॥ जरी सेतु न मोडे माझेन ॥ तरी तुझे ध्वजस्तंभीं बैसोन ॥ तुज अधीन होईन मी ॥१५८॥
मग पार्थें धनुष्य चढवूनी ॥ बाण सोडिला अभिमंत्रूनी ॥ अभंग सेतु केला ते क्षणीं ॥ म्हणे मोडूनि टाकीं आतां ॥१५९॥
हनुमंत उडोनि गगनीं गेला ॥ सेतूवरी येऊनि पडिला ॥ सेतु मोडूनि चूर्ण केला ॥ हनुमंत गर्जला भुभुःकारें ॥१६०॥
सेतु मोडला देखोनी ॥ पार्थें धनुष्य बाण ठेवूनि धरणीं ॥ बहुत काष्ठें मेळवूनी ॥ ढीग केला असं भाव्य ॥१६१॥
जात वेद चेत विला तत्काळ ॥ आकाशपंथें धांवती ज्वाळ ॥ पार्थें स्त्रान विधि करूनि सकळ ॥ नेम आपुला सारिला ॥१६२॥
करूनि अग्नीसी प्रदक्षिणा ॥ ह्रदयीं आठविले श्री कृष्ण ध्याना ॥ किरीट कुंडल मंडित वदना ॥ पीत वसना चतु र्भुजा ॥१६३॥
म्हणे कृष्णा द्वार काधीशा ॥ मधुकैट भारिया जगन्निवासा ॥ हे रमाधवा क्षीराब्धिवासा ॥ मुरहरा शेष शायी ॥१६४॥
हे रुक्मिणी वल्लभा जना र्दना ॥ हे कंसारे नरका सुरमर्दना ॥ हे मधु सुदना निज सुखवर्धना ॥ मन्मथ जनका श्रीरंगा ॥१६५॥
हे भक्तवत्सला यादवेंद्रा ॥ हे केशवा दुरित कानन वैश्वानरा ॥ हे दान वसमर धीरा ॥ इंदिरावरा श्रीहेर ॥१६६॥
हे माधवा नवपंक जपत्राक्षा ॥ अनंत नयना ह्रदय साक्षा ॥ देव वंद्या कर्माध्यक्षा ॥ कोणा परीक्षा नव्हे तुझी ॥१६७॥
द्वार केसी असतां जगन्नाथ ॥ कळलें संकटीं पडला पार्थ ॥ भक्तकैवारी रमाकांत ॥ आला धांवत सेतु बंधीं ॥१६८॥
द्विजवेष धरिला सर्वेंशें ॥ हनुमंता लागीं साक्षेपें पुसे ॥ हा कोण अग्निप्रवेश करीतसे ॥ वर्तमान कैसें सांगें मज ॥१६९॥
हनुमंतें कथिलें वर्तमान ॥ त्यावरी बोले तो ब्राह्मण ॥ या गोष्टीसी साक्ष कोण ॥ मज लागून सांगिंजे ॥१७०॥
मारुती म्हणे साक्ष नाहीं ॥ द्विज म्हणे असत्य पाहीं ॥ साक्ष नसतां व्यर्थ सर्वही ॥ वेद ऐसें बोलतसे ॥१७१॥
तरी मजदेखतां रचील सेतु ॥ वरी उडी घालीं अकस्मातु ॥ मग पार्थाहातीं त्वरितु ॥ मागुती सेतु बांध विला ॥१७२॥
गुप्तरूपें जगज्जीवन ॥ सेतूखालीं घातलें सुदर्शन ॥ मग ऊर्ध्व उडाला अंजनी नंदन ॥ निराळपंथें तेधवां ॥१७३॥
उडी घातली अकस्मातु ॥ परी तैसाचि अंभग सेतु ॥ वरी आदळोनि हनुमंतु ॥ एकीकडे पडियेला ॥१७४॥
जैसा शिळेवरी गोटा पडे ॥ तो उसळोनि जाय एकीकडे ॥ पार्थ निरखूनि पाहे ब्राह्यणा कडे ॥ तों द्वार काधीश ओळखिला ॥१७५॥
ब्राह्मण म्हणे वायु सुता ॥ याचे ध्वजस्तंभीं बैसें आतां ॥ तेव्हां आपुलें स्वरूप तत्त्वतां ॥ प्रकट केलें गोविंदें ॥१७६॥
अर्जुनासी धरूनि वन माळी ॥ मारुतीचे हातीं देत ते वेळीं ॥ म्हणे यासी तूं सांभाळीं ॥ कृषा करूनि सर्वदा ॥१७७॥
जाहला पृथ्वीसी दैत्यभार ॥ तुम्ही आम्ही आणि हा पार्थवीर ॥ करूं दुष्टांचा संहार ॥ अकर्मकारी सर्वही ॥१७८॥
रामावतारीं तुवां सेवा करून ॥ मजवरी केला उपकार पूर्ण ॥ आतां सांभाळीं हा अर्जुन ॥ ध्वजीं बैसोन पाठी राखीं ॥१७९॥
तुज जिंकी ऐसा कोणी ॥ नाहीं वीर त्रिभुवनीं ॥ हनुमंत लागला हरिचरणीं ॥ म्हणे आज्ञा प्रमाण मज तुझी ॥१८०॥
गुप्त जाहला भगवान ॥ आला द्वर कावती लागून ॥ हनुमंताचि आज्ञा घेउण ॥ चालिला अर्जुन तेथोनि ॥१८१॥
तों सुभद्रा श्री कृष्णाची भगिनी ॥ देऊं केली होती अर्जुना लागूनी ॥ मग पार्थ तीर्थें करा वया मेदिनीं ॥ बहुत दिवस गेला पैं ॥१८२॥
त्यावरी बल भद्रें केली विचारणा ॥ कीं सुभद्रा द्याची दुर्यों धना ॥ परी तें न ये श्रीरंगाच्या मना ॥ अंतरीं वासना अर्जुना कडे ॥१८३॥
बल भद्रें निश्चय केला सत्य ॥ जों आला नाहीं वीर पार्थ ॥ तों दुर्योधनासी द्यावी त्वरित ॥ ऐसा निश्चय पूर्ण केला ॥१८४॥
इच्छीत श्री कृष्णाचें मन ॥ या समयीं अर्जुन ॥ वैकुंठनाथ ब्रह्मसनातन ॥ इच्छामात्रें सर्व करी ॥१८५॥
तों तीर्थें करूनि पार्थ ॥ द्वारकेसी आला अकस्मात ॥ महा तापसी वल्कल वेष्टित ॥ नोळखे निश्चित त्या कोणी ॥१८६॥
श्री कृष्णसी हेर सांगत ॥ नगरा बाहेरी एक महंत ॥ महातपोधन प्रताप वंत ॥ तीर्थें करीत पातला ॥१८७॥
ऐसें ऐकोनि जगज्जीवन ॥ म्हणे घेऊं महंताचें दर्शन ॥ द्वारके बाहेरी येऊन ॥ भेटता जाहला तापसिया ॥१८८॥
अंतरीं कळली असे खूण ॥ कीं आला प्राण सखा अर्जुन ॥ बाह्यात्कारें पुसे तुम्ही कोण ॥ कोण आश्रमीं राहतां ॥१८९॥
पार्थ म्हणे मी ब्रह्माचारी ॥ स्वेच्छें क्रीडतों पृथ्वीवरी ॥ हरि म्हणे आमुचे नगरीं ॥ चातुर्मास्य क्रमिजे पैं ॥१९०॥
तापसी राहविला चार मास ॥ श्री कृष्ण आला मंदिरास ॥ सांगे वसु देव बल भद्रांस ॥ महा तापासी आला असे ॥१९१॥
बलराम आणि यादवेंद्र ॥ ताप सियासी भेटले समग्र ॥ परी हा वसुदेव भगिनी पुत्र ॥ न जाणती ऐसें कोणीही ॥१९२॥
मग प्रार्थूनियां रेवतीनाथें ॥ घरा आणिलें महंतातें ॥ सर्वही भजती भावार्थें ॥ नवला तेथें वर्तलें ॥१९३॥
रैवतक पर्वतीं महाशक्ती ॥ तिचे यात्रेसी यादव जाती ॥ संकर्षण आणि रमापती ॥ निघती वसुदेव उग्रसेन ॥१९४॥
प्रार्थूनियां रेवतीनाथें ॥ बोला विलें समस्तांतें ॥ नरनारी निघाल्या तेथें ॥ शक्तीचिये यात्रेसी ॥१९५॥
श्रृंगारिला चतुरंग दल भार ॥ बली यादव संपत्ति सागर ॥ वाद्यें वाजती अपार ॥ सनया सुखर गर्जती ॥१९६॥
देव की आदि यादवव निता ॥ ज्या श्रृंगारन भींच्या विद्युल्लता ॥ चातुर्यराशी सौभाग्य सरिता ॥ दिव्यया नारूढ जाती ॥१९७॥
त्यांमाजी श्रीरंग भगिनी ॥ सुभद्रा देवी लावण्य खाणी ॥ देवांगना नागिणी पद्मिणी ॥ स्वरूपावरूनि ओंवाळिजे ॥१९८॥
दमयंती सुलोचना पंच शरादारा ॥ मय कन्या रूपवती तारा ॥ जिच्या विलोकितां वदन चंद्रा ॥ लाजोनि जाती तत्काल ॥१९९॥
कमल भवांड मंडप शोधितां ॥ सुंदर नाहीं श्री कृष्णा परता ॥ त्याची भगिनी वसुदेव दुहिता ॥ तिचें स्वरूप अद्भुत ॥२००॥
नक्षत्रें निर्मल नभमंडळीं ॥ तैशी झळके मस्तकीं मुक्ताजाळी ॥ बिजवरा मिरवे भाळीं ॥ आकर्णनेत्री सुभद्रा ॥२०१॥
कवि गुरुते जासी उणें आणिती ॥ तेवीं मुक्तघोष कर्णीं डोलती ॥ उघडिली दिव्यरत्न खाणी ती ॥ तैशी दशनीं प्रभा फांके ॥२०२॥
नेत्रीं शोभे सोगयाचें अंजन ॥ नाचे शफरी ध्वज देखोन ॥ चपलेपरी झळके दिव्यवसन ॥ पायी पैंजण नेपुरें ॥२०३॥
असो यादव ललना परम सुंदर ॥ त्यांत सुभद्रा अत्यंत सुकुमार ॥ सुवर्ण शिबि केमाजी सत्वर ॥ आरूढोनि जात असे ॥२०४॥
तों उभय कृष्ण एके रथीं ॥ चमूमाजी मिरवत जाती ॥ जेवीं पुरंदर आणि वाचस्पती ॥ एका सनीं बैसले ॥२०५॥
सुवर्ण यानीं सुभद्रा रत्न ॥ कपिध्वज लक्षीतसे दुरुन ॥ मनसिजें व्यापिलें मन ॥ वेधले नयन तिकडेचि ॥२०६॥
तें देखोनि सुहास्यवदन ॥ मन्मथ जनक बोले वचन ॥ जेवीं अज्ञ तटस्थ द्रव्य देखोन ॥ तैसे पाहतां कोणी कडे ॥२०७॥
ब्रह्मचारी तुम्ही महंत ॥ भलती कडे कां गुंतलें चित्त ॥ मग म्हणे वीर पार्थ ॥ स्थिर होई ऐसें करीं ॥२०८॥
राज्य भांडारींचे रत्न तत्त्वतां ॥ केवीं येईल दुर्बलाच्या हाता ॥ यावरी कमलोद्भवपिता कर्णीं सांगे पार्थ्याच्या ॥२०९॥
यात्रेहूनि परततां जाण ॥ माझिया दिव्यस्यंदनीं बैसोन ॥ हरोनियां सुभद्रारत्न ॥ पवनाहुन जाईं त्वरें ॥२१०॥
ऐकोनि किरीटी डोलवी मान ॥ यवरी रैवताचला जाऊन ॥ शक्तिपूजन वन भोजन ॥ लहान थोरीं संपादिलें ॥२११॥
समय पाहूनि क्षीराब्धि जानाथ ॥ धनं जयासी दावी भ्रूसंकेत ॥ तों सुभद्रेचेंही चित्त ॥ पार्थस्वरूपीं वेधलें ॥२१२॥
सुभद्रा मानसीं भावीत ॥ पार्था ऐसा दिसतो महंत ॥ तों तेणें उचलोनि अकस्मात ॥ स्यंदनावरी घेतली ॥२१३॥
त्रुटी न लागतां अर्जुन ॥ जात सुरेशप्रस्थीं मार्ग लक्षून ॥ अश्व जाती मनीवेगे करून ॥ शैव्य सुग्री वादिक चारी ॥२१४॥
मागें गाजली एक सरसी ॥ सुभद्रा घेऊनि गेला तापसी ॥ फुटे प्रलयीं जलराशी ॥ तैसे यादव धांवले ॥२१५॥
प्रद्युन्मसांबादिक हिरकुमार ॥ म्हणती धरा धरा रे पळतो तस्कर ॥ देखोनि यादवांचे भार ॥ मुरडिला रहंवर अर्जुनें ॥२१६॥
पार्थें आपुलें स्वरूप र्पकटिलें ॥ जें वस्त्रा भरणीं मिरवलें ॥ सीता संतापहरण ते वेळे ॥ ध्वजीं येऊनि बैसला ॥२१७॥
अभिवन चाप टणत्कारून ॥ सोडिले बाणांसाठीं बाण ॥ जैशा धारा वर्षे घन ॥ गेले भुलोन यादव ॥२१८॥
अर्जुनाचा दारूण मार ॥ कोणी उभा न राहे समोर ॥ रेवतीवल्ल भासी समाचार ॥ श्रुत जाहला सर्वही ॥२१९॥
तापसी नव्हे हा श्वेतवाहन ॥ समरीं नाटोपे कोणा लागून ॥ रणपंडित सुजाण ॥ यादव सैन्प मोडिलें ॥२२०॥
परम कोपला बल भद्र ॥ सांवरी मुसळ आणि नांगर ॥ मनांत हांसे श्री धर ॥ यांसी तो वीर नाटोपे ॥२२१॥
वीर क्रोधावले सस्त ॥ हरि निवान्तरूय आहे निश्चित ॥ मग हलधर बोलत ॥ काय मनांत योजीतसां ॥२२२॥
हरि म्हणे तुमचा संकल्प होता ॥ कीं सुभद्रा द्यावी वीरा पार्था ॥ संकर्षण म्हणे रे अच्युता ॥ सर्वही करणें तुझेंचि ॥२२३॥
हांसोनि बोले रुक्मिणीरमण ॥ किरीटी हूनि वर श्रेष्ठ कोण ॥ सुभद्रे सारिखें दिव्य रत्न ॥ नेऊनि द्यावें मग कोणा ॥२२४॥
निंदोनियां राजहंसा ॥ मुक्ताफळें अर्पावीं वायसा ॥ उपेक्षूनि परीक्षका डोळसा ॥ जन्मांधाहातीं रत्न द्यावें ॥२२५॥
पंडित सत्पात्र दवडून ॥ शत मूर्खा अनर्घ्य दान ॥ कोंदणींची पाच शोभायमान ॥ चिखलीं रोंवून व्यर्थ कीं ॥२२६॥
सांडोनि पार्थ नरवरेश ॥ कोणता लक्षणयुक्त असे पुरुष ॥ शक्राहुनि विशेष ॥ धैर्य वीर्य जयाचें ॥२२७॥
भार्गव किंवा जानकीरमण ॥ तेवीं धनुर्धरपंडित जाण ॥ तेजस्वी जैसा चंडकिरण ॥ खलदंडणीं कृतान्तसा ॥२२८॥
सौंदर्य तारुण्य देखोन ॥ पाहे खालीं मीनकेतन ॥ सर्वांहूनि सुलक्षण ॥ तृतीय नंदन पंडूचा ॥२२९॥
त्यावरी आनकदुंदुभिभगिनी सुत ॥ धीर वीर प्रतापवंत ॥ ऐसा आप्त टाकोनियां पार्थ ॥ कोणासी देतां सुभद्रा ॥२३०॥
हांसोनि बोले जनार्दन ॥ त्यासी जरी भिडावें समरीं जाऊन ॥ तरी अनिवार तो अर्जुन ॥ मज कदा नाटोपे ॥२३१॥
यादव भार मोडील सकल ॥ मज तो तत्काल धरूनि नेईल ॥ मग तुम्हांसी संकड पडेल ॥ सोडवायाचें पुढती पैं ॥२३२॥
ऐसें ऐकतां कृष्ण वचन ॥ उगाचि राहिला संकर्षण ॥ वीर श्री अनल गेला विझोन ॥ हरिवचन मेघ वर्षतां ॥२३३॥
तंव वसुदेव देवकी येऊन ॥ करिती बलरा माचें समाधान ॥ आम्हीं सुभद्रा दिधली पार्था लागून ॥ यथाविधि लग्न करा ॥२३४॥
ऐसें समाधान केलें ॥ पार्थासी बोलावूं पाठविलें ॥ राम वसुदेव पुढें गेले ॥ मिरवीत आणिलें पार्थासी ॥२३५॥
यथा सांग लग्न लाविलें ॥ उग्रसेने भांडार फोडिलें ॥ चार दिवस गोड केलें ॥ आंदण दिधलें अपार ॥२३६॥
मग बोळविला श्वेत वाहन ॥ निघे सवें सुभद्रा घेऊन ॥ एक संवत्सर संपूर्ण ॥ पुष्करक्षेत्रीं क्रमियेला ॥२३७॥
द्वादश वर्षें पूर्ण भरतां ॥ शक्रात्मज आला शक्रप्रस्था ॥ धर्म भीममाद्री सुतां ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥२३८॥
धर्मासी साष्टांग नमून ॥ आदरें दिधलें आलिंगन ॥ जैसे भरत आणि रघुनंदन ॥ चतुर्दश वर्षीं भेटले ॥२३९॥
मघवा आलिंगी अंगिरा सुत ॥ तेवीं भीमें ह्रदयीं धरिला पार्थ ॥ कंठ जाहला सद्नदित ॥ एक एका न सोडिती ॥२४०॥
गजास्य आणि षडास्य ॥ यांसी आलिंगी व्योमकेश ॥ तैसा नकुल सहदेवांस ॥ पार्थ भेटला प्रीतीनें ॥२४१॥
श्री कृष्ण जनक भगिनी ॥ साष्टांग नमी पाकशा सनी ॥ सुभद्रा समस्तांचे चरणी ॥ मस्तक ठेवी आदरें ॥२४२॥
सर्व वर्तमान सांगोन ॥ सुभद्रेसी हातीं धरून ॥ पांचाली कडे गेला अर्जुन ॥ बोले हांसोन काय ते ॥२४३॥
अंतरीं संतोष अद्भुत ॥ वरिवरी रुसोनि द्रौपदी बोलत ॥ आतां इकडे यावयाचा कार्यार्थ ॥ नाहीं कांहींच जाणिजे ॥२४४॥
सद्यस्तप्त घृत सांडून ॥ मग जुनियाचें कया कारण ॥ नूतन वस्त्र केलें प्रावरण ॥ राहिलें जीर्ण सहजचि ॥२४५॥
तों कृष्णेचिये चरणीं ॥ सुभद्रा लागली प्रेमें करूनी ॥ पांचालीनें ह्रदयीं धरूनी ॥ आलिंगिली सप्रेम ॥२४६॥
म्हणे भाग्या नाहीं माझिया अंत ॥ आम्ही कृष भगिनी दोघी विख्यात ॥ आनंदला ऐकोनि वीर पार्थ ॥ हर्ष गगनीं न समाये ॥२४७॥
महाराज ब्रह्मा नंददिनमणी ॥ उदय पावला ह्रदय चिद्नगनीं ॥ श्री धर सूर्यकांतीं अवनीं ॥ पूर्ण ज्ञानाग्नि प्रकटला ॥२४८॥
तेणें जाळिलें दुरित कानन ॥ तों रुक्मिणी चित्तचात कघन ॥ वर्षतां स्वानंद जीवन ॥ ब्रह्या नंदांकुर विरूढले ॥२४९॥
पांडवपालका पांडुरंगा ॥ ब्रह्मा नंदा विजया भंगा ॥ श्री धर वरदा निःसंगा ॥ कथा रसिक चालवीं पुढें ॥२५०॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत । त्यांतील सारांश यथार्थ ॥ त्रयोदशाध्यायीं कथियेला ॥२५१॥
हति श्री श्रीधर कृतपांडवप्रतापादिपर्वणि त्रयोदशाध्यायः ॥१३॥
श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP