मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|

श्यामची आई - प्रस्तावना

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. मातेबद्दलच्या असणार्‍या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे.
नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९/२/१९३३ गुरूवारी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३/२/१९३३ सोमवारी पहा्टे त्या संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. 

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP