मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|

जय मृत्युंजय - घेइ लाडके या सदनाचा घास न...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


घेइ लाडके या सदनाचा घास निरोपाचा ।
उत्सव तव गे पाठवणीचा तुझ्या मंगलाचा ॥१॥
विनायकाचा कर भाग्याचा येई तव हाता ।
तूं चिपळुणकर-सुता जाहलिस सावरकर आता ॥२॥
दोन कुळांचा दुवा ठराया जन्म कन्यकांचा ।
सामवुनि घे वरकुल, वाढे वंश मानवाचा ॥३॥
भ्रतार यमुना, चतुर देखणा भक्त शारदेचा ।
विद्याव्रत-सांगतेत होइल धनी संपदेचा ॥४॥
विशाल होइल सदन तुझे गे भरुनी संसार ।
धनधान्याने भरले राहिल घरचे कोठार ॥५॥
द्वैताला विसरुन यापुढे अद्वैता ठेवा ।
पण लहान वयातच विचाराला प्रगल्भता येत असलेल्या विनायकाला वाटत असेल-
तारुण्याचे उत्साहाचे वय आयुष्याचे ।
व्रत घेण्याचे आणिक शपथा पूर्ण करायाचे ॥७॥
एकाकी मी नसे यापुढे व्रतपूर्तीसाठी ।
एक तरी मज अधिकाराचा मित्र असे गाठी ॥८॥
विनायास चालतो यौवनी कुलवर्धनगाडा ।
व्यर्थ असे स्वातंत्र्यवाचुन भव्य राजवाडा ॥९॥
सर्वस्वाच्या त्याग-परिमले भरेन संसार ।
राहिल भरले धनधान्याने भारत-भांडार ॥१०॥
कुटुंबापरी एकजीव मी भारत घडवीन ।
उत्कर्षाचे मानवतेच्या युद्व रंगवीन ॥११॥
विवाह नाही अडसर माते ते तर वरदान ।
व्याप्ति वाढली सर्वस्वाची, वाटे अभिमान ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP