श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग १५

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


औटपीठचीये तळीं । भ्रमरगुंफेचिया पाठारमुळी ।

चिन्मय मोटी झळाळी । महातेज ॥१५॥

टीकाः

औट पीठांचे शेवटीं । भ्रमर गुंफेचें तळवटी । नवल प्रत्ययाची गोठी । मौक्तिकरुप ॥१॥

धुताचियेमोती जळीं । सुर्यकिरणीं जेवि झळाळी । तयेपरीच हे पहाली । मुक्तवस्तु ॥२॥

जें पहातां अति सतेज । निजाचेहि निजगुज । नामीं सांचलें अनाम सहज । उघड डोळीयां ॥३॥

निज उघडपणां आलें । तंव तें उपाधिपैल जालें । साकारातीत होवोनि ठेलें काय सांगो ॥४॥

जेथ न पोचे नजर । जेणें फोडिलें अंबर । रुप पहातां अरुवार । गगनटाकें ॥५॥

बिंदुमात्र नील मोती । जे कां सत्य अखंड स्थिति । अनंत ब्रह्माडें होती जाती । जये ठायी ।\६॥

हरिहरांचिया मुर्ति । जयापोटी येती जाती । ऐसीया विखुरली मोती । शुन्यापाशीं ॥७॥

अर्धमात्रेचिया उपरि । दिसे मौक्तिक झालरी । दाही दिशेसी लहरी । मोतियाची ॥८॥

पहातां हे मुक्तद्शा उरलीच ना जीवदशा । होवोनि ठेला नव्हताचि ऐसा अनन्यपणें ॥९॥

जाणीव नेणीव हें स्थिती । नोहें ऊश्वारणें निगुती । तेचि लक्षिलें अलक्ष मोती । पाणीदार ॥१०॥

जाणने पैल अभ्यासु । करी तोचि विष्णुदासु । जयाची सुमाति प्रकाश अध्यात्मिया ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP