मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|

पांडुरंगाची आरती - ओंवाळूं गे माये विठ्ठल सब...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

ओंवाळूं गे माये विठ्ठल सबाह्य साजिरा,  सबाह्य साजिरा ॥
राई रखुमाई सत्यभामेच्या वरा ॥ धृ. ॥

कनकाचे पर्येळी उजळोनी आरती,  उजळोनी आरती ॥
रत्नदीपशोभा कैसा प्रकाशल्या ज्योती ॥ १ ॥

मंडितचतुर्भुज कानी शोभति कुंडलें, कानी शोभति कुंडलें ॥
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ॥ २ ॥

वैजयंतिमाळ गळा शोभे स्यमंत, गळां शोभा स्यमंत ॥
शंखचक्रगदापद्म आयुधें शोभते ॥ ३ ॥

सांवळा सुंदर जैसा कर्दळिचा गाभा, जैसा कर्दळिचा गाभा ॥
चरणीची नुपुरें वांक्या गर्जतो नाभा ॥ ४ ॥

ओंवाळितां मन माझें ठाकलें ठायी ॥
समाधिस्थ समान तुकय लागला पायी ॥ ओवाळूं ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP